Thursday, June 17, 2010

शेझवान नूडल्स


साहित्य:
१. हक्का नूडल्स १ पाकीट
२. प्रत्येकी १ वाटी चिरलेली कांद्याची पात, लांब चिरलेला कोबी
३. प्रत्येकी अर्धी वाटी गाजर, सिमला मिरची, श्रावण घेवडा लांब लांब चिरून
४. बारीक चिरलेला फ्लॉवर, मश्रूम प्रत्येकी अर्धी वाटी
५. बरीक चिरलेले आले, लसूण, मिरच्या प्रत्येकी १ टेबलस्पून
६. सोया सॉस, शेझवान सॉस प्रत्येकी ४ चमचे
७. चिली सॉस २ चमचे.

कृती:
१. एका पातेल्यात ८ कप पाणी गरम करावे. पाणी उकळले की त्यात हक्का नूडल्स घालून २-३ मिनिटे नूडल्स पाणी न घालता शिजवून घ्याव्या.
२. लगेच नूडल्स चाळणीत ओतून त्यातले गरं पाणी काढून टाकावे व त्या गार पाण्याखाली धराव्या. लगेच  परातीत ओतून त्यावर १ टेबलस्पून तेल घालून टॉस करून घ्याव्या म्हणजे नूडल्स मोकळ्या होतात.
३. एका पसरट कढईमधे २ टेबलस्पून तेल गरम करावे. तेल सणसणीत तापून त्यातून जरासा धूर यायला लागला की त्यात आले, लसूण, मिरच्या घलून १ मिनिट परतावे. मग त्यावर गाजर, सिमला मिरची, श्रावण घेवडा घालून २ मिनिटे परतावे. मग त्यावर कोबी, फ्लॉवर घालून २ मिनिटे परतावे मग कांद्याची पात घालून १ मिनीट परतावे.
४. मग सर्व भाज्यांवर सोयासॉस, चिलीसॉस, शेझवान सॉस घालून परतावे.
५. त्यावर शिजवलेल्या भाज्या घालून नीट परतावे. भाज्या व सॉसचे मिश्रण नूडल्सला सगळीकडे सारखे लागले पाहिजे.
५. मग चवीप्रमाणे मीठ घालून परतावे आणि तयार नूडल्स कांद्याच्या पातीने गार्निश करून सर्व्ह कराव्या.

टीप्स:
१. सर्व भाज्या चिरताना अगदी बारीक चिराव्या.
२. नूड्ल्स फार शिजवू नये. चांगल्या लागत नाहीत.  सगळ्या भाज्यासुद्धा कच्चटच ठेवाव्या. करकरीत लागल्या पाहिजेत.
३. पूर्ण वेळ गॅस मोठाच ठेवावा. मीठ जरा बेताने घालावे. कारण सोयासॉस व चिलीसॉस मधे मीठ असते.
४. ह्याच कृतीप्रमाणे नूडल्सच्या ऐवजी २ वाट्या तांदुळाचा मोकळा भात शिजवून घेऊन तो घालून शेझवान राईस करता येईल.
=====-----=====-----=====
Notice: The information contained in this e-mail
message and/or attachments to it may contain
confidential or privileged information. If you are
not the intended recipient, any dissemination, use,
review, distribution, printing or copying of the
information contained in this e-mail message
and/or attachments to it are strictly prohibited. If
you have received this communication in error,
please notify us by reply e-mail or telephone and
immediately and permanently delete the message
and any attachments. Thank you


Wednesday, June 9, 2010

फ्रॅंकी


साहित्य:
१. मैदा २ वाट्या
२. २ भोपळी मिरच्या
३. २ कांदे
४. २ एकदम कडक टोमॅटो
५. १ वाटी किसलेले पनीर
६. १ वाटी किसलेले चीज
७. अर्धी वाटी पुदीना, ४ मिरच्या, अर्धी वाटी कोथिंबीर एकत्र बारीक वाटून
८. तिखट, मीठ, चाट मसाला चवीप्रमाणे
९. थोडे बटर/तूप

कृती
१. मैद्यामधे थोडेसे मीठ, २ चमचे तेलचे मोहन घालून मध्यम मळून घ्यावा. हे पीठ अर्धा तास झाकून ठेवावे.
२. अर्ध्या तसाने पीठ परत एकदा मळून घेऊन त्याच्या मध्याम आकाराच्या पोळ्या कर्रोन घ्याव्यात. पोळ्या भाजताना जरा कच्चट भाजाव्या.
३. ढोबळी मिरची, कांदा, टोमॅटो लांब लांब आणि एकदम बारीक चिरून घ्यावे.
४. मग मैद्याची एक पोळी घेऊन त्याला आधी पुदीना चटणी लावावी.
५. मग त्यावर मध्यभागी कांदा, ढोबळी मिरची, टोमॅटोचे काप पसरावेत.
६. त्यावर किसलेले पनीर आणि चीज घालावे.
७. त्यावर तिखट, मीठ, चाट मसाला भुरभुरावा आणि पोळीचा रोल करावा.
८. तव्यावर तूप/बटर घालून हा रोल खरपूस भाजून घ्यावा.
९. मग सर्व्ह करतान एका रोलचे २ तुकडे करून टोमॅटो केचपबरोबर सर्व्ह करावा.

टीप्स :
१. मैद्याच्या पोळीऐवजी उरलेल्या शिळ्या पोळ्या वापरूनही ही फ्रॅंकी चांगली लागते.
२. इतर भाज्याही आवडीप्रमाणे वापरू शकतो. पण भाज्या लांब आणि अगदी बारीक चिराव्या. नाहीतर खाताना खूप कच्च्या लागतात. तसेच भाज्या फार शिजू देउ नयेत. क्रिस्पी लागल्या पाहिजेत.

=====-----=====-----=====
Notice: The information contained in this e-mail
message and/or attachments to it may contain
confidential or privileged information. If you are
not the intended recipient, any dissemination, use,
review, distribution, printing or copying of the
information contained in this e-mail message
and/or attachments to it are strictly prohibited. If
you have received this communication in error,
please notify us by reply e-mail or telephone and
immediately and permanently delete the message
and any attachments. Thank you


Wednesday, December 9, 2009

कॉर्न राईस

साहित्य:
. वाट्या बासमती तांदूळ
. वाटी स्वीट कॉर्न
. अर्धी वाटी लांब-लांब चिरलेला कोबी
. कांदा पातळ उभा चिरून
. बटाटा लांब चिरून (फिंगर चिप्स साठी चिरतो तसा)
. चमचे एव्हरेस्ट शाही बिर्याणी मसाला
. लसूण पाकळ्या, पाव वाटी पुदिना, अर्धी वाटी कोथिंबीर एकत्र बारीक वाटून.
. हळद, मीठ, जिरे
. चमचे साजूक तूप/ अमूल बटर

कृती
. वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास निथळत ठेवावे.
. कुकरमधे पाव वाटी तेल गरम करून घ्यावे. त्यात जिरे घालून ते तडतडले कि त्यात हळद घालावी.
. मग त्यावर कांदा, बटाटा, कोबी घालून परतून घ्यावे. त्यावर स्वीट कॉर्न घालावे. सगळे नीट परतले गेले की तांदूळ घालून परतावे. मग त्यावर बिर्याणी मसाला आणि पुदीना-कोथींबीरीचे वाटण घलून परतावे.
. त्यावर वाट्या गरम पाणी घालून चवीपुरते मीठ घालावे आणि शिट्ट्या कराव्या.
. मग वाफ गेल्यावर कूकरचे झाकण उघडून त्यावर चमचे बटर/ तूप घालून ढवळावे आणि सर्व्ह करावे.

टीप्स:
. ह्या भातात स्वीट कॉर्न असल्यामुळे तिखट घातलेले नाही. जर तिखट आवडत असेल तर - मिरच्या पुदिना कोथिंबीरीबरोबरच वाटून घालाव्या.
. इतर भाज्याही आवडत असतील तर घालाव्या. पण भाज्यांच्या बरोबरीने कॉर्न असायला हवेत. म्हणजे इतर भाज्या सगळ्या मिळून वाटी असतील तर वाटी कॉर्न आणि वाट्या तांदूळ असे प्रमाण ठेवावे.
. मसालेदार चव हवी असेल तर चमचे बिर्याणी मसाल्याऐवजी चमचा बिर्याणी मसाला, चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा तिखट घालावे.

Thursday, August 27, 2009

आलू - गोभी

साहित्य:
१. अर्धा किलो फ्लॉवर मोठे मोठे तुकडे करून
२. २ बटाटे मोठे तुकडे करून
३. फोडणीचे साहित्य
४. १ टी स्पून धने पावडर
५. अर्धा टी स्पून जिरे पावडर
६. अर्धा टी स्पून लाल तिखट
७. अर्धा टी स्पून गरम मसाला
८. मीठ चवीप्रमाणे
९. थोडी कोथिंबीर

कृती
कढईमधे थोड्या जास्त तेलात मोहरी. हळद, हिंग घालून फोडणी करून घ्यावी. त्यात फ्लॉवर, बटाट्याचे तुकडे घालून १ मिनीट परतून घ्यावे. मग त्यात १ वाटी पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालून झाकण ठेवून फ्लॉवर व बटाटे शिजवून घ्यावेत. मग त्यात धने पावडर, जिरे पावडर, तिखट, गरम मसाला घालून परत परतावे. एक वाफ आली की कोथिंबीर घालून गॅस बंद करावा.

टीप्स:
१. फ्लॉवर व बटाटे खूप मऊ शिजवू नयेत.
२. फ्लॉवर व बटाटे शिजवता्नाच मीठ घातल्याने भाजी जास्त चविष्ट लागते.
३. आवडत असल्यास ह्या भाजीत १ चमचा आमचूर पावडर घालावी. आंबट चव चांगली वाटते.
४. फ्लॉवर बारीक चिरून आणि बटाटे शिजवून मॅश करून घेऊन पाणी न घालता वरील प्रमाणे भाजी करावी. तेल्ही जरा कमी घालावे. ही भाजी भरून केलेले आलू-गोभी पराठे छान होतात.
 

Monday, August 17, 2009

सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा:


सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा:

साहित्य:
१. १ वाटी साजूक तूप
२. १ वाटी रवा
३. १ वाटी साखर
४. १ वाटी दूध
५. काजू बदामाचे काप, वेलची पावडर

कृती:
प्रथम कढईमध्ये १ वाटी तूप घालावे. १ वाटी रवा ह्या तुपावर मंद आचेवर गुलबी रंगावर भजून घ्यावा. दुस-या गॅसवर १ वाटी दूध व एक वाटी पाणी एकत्र करून गरम करायला ठेवावे. एक उकळी आली की गॅस बंद करावा. रवा चांगला भाजला गेला की मग त्यात हे दूध-पाण्याचे मिश्रण घालावे. रवा चांगला फुलून येईल. एक वाफ आली की मग त्यात १ वाटी साखर घालावी. साखर विरघळली की त्यात वेलची पावडर, काजू बदामाचे काप घालावे. नीट मिसळून मग गॅस बंद करावा.

टिप्स:
१. सत्यनारायणासाठी प्रसाद करताना सर्व साहित्य सव्वाच्या प्रमाणात घ्यायचे असते. तसेच त्यामधे सव्वा केळे पण घालावे.
२. आंब्याच्या दिवसात ह्याच शि-यात साखर विरघळल्यावर १ वाटी हापूस आंब्याचा रस घालून मॅंगो शिरा पण छान होतो.
३. काही लोक दूध-पाणी न घालता नुसते दुध घलूनहि शिरा करतात. पण तो अगदि भरभरीत होतो. पाणी घतल्याने शिर छान मऊ होतो.

॥श्री गणेशाय नम: ॥

॥श्री गणेशाय नम: ॥