साहित्य:
१. २ वाट्या बासमती तांदूळ
२. १ वाटी स्वीट कॉर्न
३. अर्धी वाटी लांब-लांब चिरलेला कोबी
४. १ कांदा पातळ उभा चिरून
५. १ बटाटा लांब चिरून (फिंगर चिप्स साठी चिरतो तसा)
६. २ चमचे एव्हरेस्ट शाही बिर्याणी मसाला
७. २ लसूण पाकळ्या, पाव वाटी पुदिना, अर्धी वाटी कोथिंबीर एकत्र बारीक वाटून.
८. हळद, मीठ, जिरे
९. २ चमचे साजूक तूप/ अमूल बटर
कृती
१. २ वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास निथळत ठेवावे.
२. कुकरमधे पाव वाटी तेल गरम करून घ्यावे. त्यात जिरे घालून ते तडतडले कि त्यात हळद घालावी.
३. मग त्यावर कांदा, बटाटा, कोबी घालून परतून घ्यावे. त्यावर स्वीट कॉर्न घालावे. सगळे नीट परतले गेले की तांदूळ घालून परतावे. मग त्यावर बिर्याणी मसाला आणि पुदीना-कोथींबीरीचे वाटण घलून परतावे.
४. त्यावर ४ वाट्या गरम पाणी घालून चवीपुरते मीठ घालावे आणि ३ शिट्ट्या कराव्या.
५. मग वाफ गेल्यावर कूकरचे झाकण उघडून त्यावर २ चमचे बटर/ तूप घालून ढवळावे आणि सर्व्ह करावे.
टीप्स:
१. ह्या भातात स्वीट कॉर्न असल्यामुळे तिखट घातलेले नाही. जर तिखट आवडत असेल तर ४-५ मिरच्या पुदिना कोथिंबीरीबरोबरच वाटून घालाव्या.
२. इतर भाज्याही आवडत असतील तर घालाव्या. पण भाज्यांच्या बरोबरीने कॉर्न असायला हवेत. म्हणजे इतर भाज्या सगळ्या मिळून १ वाटी असतील तर १ वाटी कॉर्न आणि २ वाट्या तांदूळ असे प्रमाण ठेवावे.
३. मसालेदार चव हवी असेल तर २ चमचे बिर्याणी मसाल्याऐवजी १ चमचा बिर्याणी मसाला, १ चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा तिखट घालावे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment