Wednesday, June 9, 2010

फ्रॅंकी


साहित्य:
१. मैदा २ वाट्या
२. २ भोपळी मिरच्या
३. २ कांदे
४. २ एकदम कडक टोमॅटो
५. १ वाटी किसलेले पनीर
६. १ वाटी किसलेले चीज
७. अर्धी वाटी पुदीना, ४ मिरच्या, अर्धी वाटी कोथिंबीर एकत्र बारीक वाटून
८. तिखट, मीठ, चाट मसाला चवीप्रमाणे
९. थोडे बटर/तूप

कृती
१. मैद्यामधे थोडेसे मीठ, २ चमचे तेलचे मोहन घालून मध्यम मळून घ्यावा. हे पीठ अर्धा तास झाकून ठेवावे.
२. अर्ध्या तसाने पीठ परत एकदा मळून घेऊन त्याच्या मध्याम आकाराच्या पोळ्या कर्रोन घ्याव्यात. पोळ्या भाजताना जरा कच्चट भाजाव्या.
३. ढोबळी मिरची, कांदा, टोमॅटो लांब लांब आणि एकदम बारीक चिरून घ्यावे.
४. मग मैद्याची एक पोळी घेऊन त्याला आधी पुदीना चटणी लावावी.
५. मग त्यावर मध्यभागी कांदा, ढोबळी मिरची, टोमॅटोचे काप पसरावेत.
६. त्यावर किसलेले पनीर आणि चीज घालावे.
७. त्यावर तिखट, मीठ, चाट मसाला भुरभुरावा आणि पोळीचा रोल करावा.
८. तव्यावर तूप/बटर घालून हा रोल खरपूस भाजून घ्यावा.
९. मग सर्व्ह करतान एका रोलचे २ तुकडे करून टोमॅटो केचपबरोबर सर्व्ह करावा.

टीप्स :
१. मैद्याच्या पोळीऐवजी उरलेल्या शिळ्या पोळ्या वापरूनही ही फ्रॅंकी चांगली लागते.
२. इतर भाज्याही आवडीप्रमाणे वापरू शकतो. पण भाज्या लांब आणि अगदी बारीक चिराव्या. नाहीतर खाताना खूप कच्च्या लागतात. तसेच भाज्या फार शिजू देउ नयेत. क्रिस्पी लागल्या पाहिजेत.

=====-----=====-----=====
Notice: The information contained in this e-mail
message and/or attachments to it may contain
confidential or privileged information. If you are
not the intended recipient, any dissemination, use,
review, distribution, printing or copying of the
information contained in this e-mail message
and/or attachments to it are strictly prohibited. If
you have received this communication in error,
please notify us by reply e-mail or telephone and
immediately and permanently delete the message
and any attachments. Thank you


No comments:

Post a Comment