Thursday, August 27, 2009

आलू - गोभी

साहित्य:
१. अर्धा किलो फ्लॉवर मोठे मोठे तुकडे करून
२. २ बटाटे मोठे तुकडे करून
३. फोडणीचे साहित्य
४. १ टी स्पून धने पावडर
५. अर्धा टी स्पून जिरे पावडर
६. अर्धा टी स्पून लाल तिखट
७. अर्धा टी स्पून गरम मसाला
८. मीठ चवीप्रमाणे
९. थोडी कोथिंबीर

कृती
कढईमधे थोड्या जास्त तेलात मोहरी. हळद, हिंग घालून फोडणी करून घ्यावी. त्यात फ्लॉवर, बटाट्याचे तुकडे घालून १ मिनीट परतून घ्यावे. मग त्यात १ वाटी पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालून झाकण ठेवून फ्लॉवर व बटाटे शिजवून घ्यावेत. मग त्यात धने पावडर, जिरे पावडर, तिखट, गरम मसाला घालून परत परतावे. एक वाफ आली की कोथिंबीर घालून गॅस बंद करावा.

टीप्स:
१. फ्लॉवर व बटाटे खूप मऊ शिजवू नयेत.
२. फ्लॉवर व बटाटे शिजवता्नाच मीठ घातल्याने भाजी जास्त चविष्ट लागते.
३. आवडत असल्यास ह्या भाजीत १ चमचा आमचूर पावडर घालावी. आंबट चव चांगली वाटते.
४. फ्लॉवर बारीक चिरून आणि बटाटे शिजवून मॅश करून घेऊन पाणी न घालता वरील प्रमाणे भाजी करावी. तेल्ही जरा कमी घालावे. ही भाजी भरून केलेले आलू-गोभी पराठे छान होतात.
 

Monday, August 17, 2009

सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा:


सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा:

साहित्य:
१. १ वाटी साजूक तूप
२. १ वाटी रवा
३. १ वाटी साखर
४. १ वाटी दूध
५. काजू बदामाचे काप, वेलची पावडर

कृती:
प्रथम कढईमध्ये १ वाटी तूप घालावे. १ वाटी रवा ह्या तुपावर मंद आचेवर गुलबी रंगावर भजून घ्यावा. दुस-या गॅसवर १ वाटी दूध व एक वाटी पाणी एकत्र करून गरम करायला ठेवावे. एक उकळी आली की गॅस बंद करावा. रवा चांगला भाजला गेला की मग त्यात हे दूध-पाण्याचे मिश्रण घालावे. रवा चांगला फुलून येईल. एक वाफ आली की मग त्यात १ वाटी साखर घालावी. साखर विरघळली की त्यात वेलची पावडर, काजू बदामाचे काप घालावे. नीट मिसळून मग गॅस बंद करावा.

टिप्स:
१. सत्यनारायणासाठी प्रसाद करताना सर्व साहित्य सव्वाच्या प्रमाणात घ्यायचे असते. तसेच त्यामधे सव्वा केळे पण घालावे.
२. आंब्याच्या दिवसात ह्याच शि-यात साखर विरघळल्यावर १ वाटी हापूस आंब्याचा रस घालून मॅंगो शिरा पण छान होतो.
३. काही लोक दूध-पाणी न घालता नुसते दुध घलूनहि शिरा करतात. पण तो अगदि भरभरीत होतो. पाणी घतल्याने शिर छान मऊ होतो.

॥श्री गणेशाय नम: ॥

॥श्री गणेशाय नम: ॥